
तुम्ही सुद्धा Bowl ला "बाउल" आणि Meme ला "मेमे" म्हणता?
असे कितीतरी इंग्रजी शब्द आहेत जे आपण नकळत चुकीच्या पद्धतीने उच्चारतो. पण घाबरू नका, त्यात दोष आपला नाही, इंग्रजी स्पेलिंग्ज मुळे हा गोंधळ होणे साहजिक आहे. असे असले तरी काही विशिष्ठ ठिकाणी किंवा विशिष्ठ लोकांशी बोलताना ह्या शब्दांचे नेमके उच्चार माहित असलेले कधीही बरे. After all, a good impression matters a lot.
खाली रोजच्या वापरात येणारे काही शब्द व त्यांचे योग्य उच्चार दिले आहेत. तुम्ही वाचा व इतरांनाही सांगा.
1. Restaurant: रेस्टॉरंट किंवा रेस्टॉरेंट नाही, रेस्टरॉंट किंवा रेस्ट्रॉ म्हणा.
2. Colleague: कलीग नाही, कोलीग म्हणा.
3. Coupon: कूपन नाही, कूपॉन म्हणा.
4. Resume (CV): रेझ्युम किंवा रिझ्युम नाही, रेझ्युमे म्हणा.
5. Data: डाटा नाही, डेटा म्हणा.
6. Receipt: रिसिप्ट नाही, रिसीट म्हणा.<