top of page

"शहाण्या निंदकाचे घर असावे शेजारी"
"निंदकाचे घर असावे शेजारी" म्हणजेच आपली निंदा करणारी किंवा आपल्या चुका सांगणारी एक तरी व्यक्ती आपल्या शेजारी किंवा आपल्या आयुष्यात असावी असे संत तुकाराम सांगून गेले. पण खरंच कुणाला आवडेल का अशी व्यक्ती आसपास असलेली? किती इरिटेट होतं कुणी आपल्या चुका काढत असेल तर, हो ना?


आपण सगळे कधी ना कधी चुकत असतोच. पण चूक जर वेळेत लक्षात आली आणि आपण ती सुधारली तरच आपल्याला त्याचा फायदा होतो. गम्मत म्हणजे आपल्या चुका आपल्या स्वतःच्या लक्षात नेहमी येतातच असे नाही. म्हणूनच तर, "निंदकाचे घर असावे शेजारी".


आता तुम्ही म्हणाल हे खरंच शक्य आहे का? चूक दाखविली किंवा निंदा केली तर लोकांचे मन दुखावणारच ना! एकंदर लोकांचा सर्वसाधारण गैरसमज असाच आहे, कारण आपल्या आसपास असे खूप कमी लोक आहेत जे स्वतःच्या चुका मान्य करतात आणि इतरांच्या चुका सांगताना प्रेमाने आणि त्यांचा अपमान न करता अथवा त्यांचे मन न दुखावता सांगतात.


खरं तर चूक करणाऱ्यांनी जर ती नम्रपणे कबूल केली तर चुक दाखवून देणारी व्यक्ती त्यांना तेवढी वाईट वाटणार नाही. खालील दोन प्रसंगांवरून हे तुमच्या सहज लक्षात येईल.प्रसंग एक: