top of page

तुम्हाला खात्री आहे ना तुम्ही KIA (Know-It-All) नाही?


तुम्हाला रोज असे अनेक लोक भेटत असतील ज्यांना अगदी सगळंच माहिती असतं. ते नेहमी इतरांना मार्गदर्शन करत असतात. लोक त्यांच्याकडे आवश्यक वैयक्तिक किंवा व्यावसायिक सल्ले घ्यायला जात असतात. हे लोक सोशल मीडियावर सुद्धा खूप ऍक्टिव्ह असतात आणि नेहमी इतरांशी आपले ज्ञान शेअर करत असतात.


परंतु गम्मत म्हणजे, बऱ्याचदा केवळ त्यांना स्वतःलाच असे वाटत असते कि ते इतरांची मदत किंवा त्यांना मार्गदर्शन करीत आहेत.

A know-it-all talking

खरं तर ते नेहमी इतरांचे बॉस असल्यासारखे वागत असतात. त्यांच्या कुटुंबातले किंवा त्यांच्या जवळचे लोक आणि कामाच्या ठिकाणचे त्यांचे सहकारी; अशा सर्वांवर ते वर्चस्व गाजविण्याचा प्रयत्न करीत असतात. लोकांना नको असलेले सल्लेही ते देत फिरतात. त्यांच्या जगण्याच्या किंवा कामे करण्याच्या पद्धतीत जराही बदल केलेला त्यांना आवडत नाही कारण त्यांना असा ठाम विश्वास असतो कि त्यांची पद्धत हीच सर्वात श्रेष्ठ आणि योग्य आहे. ते इतके आत्मसंतुष्ट आणि आत्ममग्न असतात कि इतर लोक जे आपापल्या क्षेत्रातले जाणकार असतील त्यांच्याकडूनही सल्ला किंवा मार्गदर्शन घेण्याची तसदी ते घेत नाहीत.


तुम्हाला माहितिये अशा लोकांना काय म्हणतात? Know-It-All (नो-इट-ऑल). आपण ह्यांना KIA (किया) म्हणूया.

 

एखादी व्यक्ती किया आहे कि नाही हे ठरविण्यासाठी खालील लक्षणे पडताळून पहा: