तुमचं इंग्रजी बोलणं इतरांना खरंच कळतं का? (भाग - २)


Consonant and Vowels in English and Marathi

"तुमचं इंग्रजी बोलणं इतरांना खरंच कळतं का" ह्या लेखाच्या पहिल्या भागात आपण पाहिलं कि आपल्या मूळ भाषेचा प्रभाव इतर भाषा बोलताना कसा जाणवतो आणि त्यामुळे आपले बोलणे समजणे इतरांना कसे कठीण होऊन बसते. आपल्या मराठी भाषेचा प्रभाव कसा इंग्रजीवर पडतो आणि त्यामुळे आपण इंग्रजी किती गमतीशीर पद्धतीने बोलतो हेही आपण पहिले. ह्यावर मात करण्यासाठी आपण मराठी आणि इंग्रजीमधले तीन महत्वाचे फरक मागच्या लेखात पाहिले. आता ह्या लेखात आपण आणखी दोन फरक पाहूया.


4. शब्दांच्या उच्चारणास घेतला जाणारा वेळ

मागच्या लेखात सांगितल्याप्रमाणे इंग्रजी बोलताना वाक्यातील काही विशिष्ट शब्दांवरच स्ट्रेस द्यायचा असतो. महत्वाचे म्हणजे अशा स्ट्रेस दिलेल्या शब्दांच्या मधे कितीही स्ट्रेस न केले जाणारे शब्द येत असले तरी ते एकमेकांना जोडायचे किंवा छोटे करायचे असतात. खालील उदाहरणाद्वारे हे तुमच्या सहज लक्षात येईल. ह्याला इंग्रजीत Linking असे म्हणतात. ह्याचेही काही सोपे नियम आहेत.


One Two Three Four

One and Two and Three and Four

One and a Two and a Three and a Four

One and then a Two and then a Three and then a Four


आता वरील वाक्यातील स्ट्रेस न केले जाणारे शब्द एकमेकांना जोडून किंवा छोटे करून बघूया.


‘and’ चा ‘n’ (एन)

‘and a’ चा ‘ana’ (अॅनं)

‘and then a’ चा ‘anthena’ (अॅन्देनं) असा उच्चार करूया.


One Two Three Four - वन टू थ्री फोर


One n Two n Three n Four - वन एन टू एन थ्री एन फोर


One ana Two ana Three ana Four - वन ऍनं टू ऍनं थ्री ऍनं फोर


One anthena Two anthena Three anthena Four - वन ऍन्देनं टू ऍन्देनं थ्री ऍन्देनं फोर


हि वाक्ये किमान पाच वेळा वाचून बघा. तुमच्या लक्षात येईल कि ह्या वाक्यांमधील स्ट्रेस (बोल्ड) केलेल्या शब्दांच्या मध्ये येणारे इतर शब्द उच्चारायला लागणारा वेळ हा चारही वाक्यांमध्ये जवळ-जवळ सारखाच आहे. ह्याला इंग्रजीत Linking असे म्हणतात. ह्याचेही काही सोपे नियम आहेत.

"मराठी किंवा इतर बऱ्याचशा भाषांमध्ये एखाद्या वाक्यात जितके जास्त शब्द तितका ते वाक्य बोलायला लागणारा वेळ जास्त असतो. इंग्रजीच्या बाबतीत असे नाही."
 

5. मराठीतील व्यंजन आणि स्वरांचे उच्चार Vs इंग्रजीतील व्यंजन आणि स्वरांचे उच्चार

आपण मराठी बोलताना जी व्यंजने आणि स्वर वापरतो ती बऱ्यापैकी इंग्रजी भाषेतही अस्तित्वात आहेत. परंतु त्यांच्या उच्चारात फरक आहे. इंग्रजीत काही व्यंजने आणि स्वर असेही आहेत जे मराठीत नाहीत. ह्यांपैकी काही उदाहरणे खालीलप्रमाणे आहेत.


मराठी ‘प’ आणि इंग्रजी ‘p’ - इंग्रजी ‘p’ चा उच्चार हा बराचसा मराठीतल्या ‘फ’ सारखा आहे. आता मी सांगतो तसे करून बघा आणि तुम्हाला हा फरक सहज लक्षात येईल.

मराठी ‘प’ - आपल्या हाताचा तळवा आपल्या गळ्यावर ठेवा आणि तोंडासमोर एक वहीचे पान धरा. आता मराठी ‘प’ चा उच्चार करा. तुमच्या हाताला गळ्यातील कंपने जाणवतील. पान थोडेसेच हलेल किंवा हलणारही नाही.

इंग्रजी ‘p’- आपल्या हाताचा तळवा आपल्या गळ्यावर ठेवा आणि ‘प’ चा उच्चार करा आणि तोंडासमोर एक वहीचे पान धरा. ह्यावेळी गळ्यात कंपने न होऊ देता 'प' चा उच्चार करा. आता पान पहिल्यापेक्षा जास्त हलेल. हा आहे इंग्रजी 'p'.


मराठी ‘र’ आणि इंग्रजी ‘r’- तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल कि आपला मराठी ‘र’ उच्चारताना आपली जीभ वरच्या दातांच्या मागे स्पर्श करते पण इंग्रजी ‘r’ उच्चारताना जीभ थोडी मागे घेतली जाते आणि महत्वाचे म्हणजे ती कुठेही स्पर्श करत नाही आणि ओठही थोडेसे गोल केले जातात.


मराठी ‘व’ आणि इंग्रजी ‘v’/ ‘w’ - मराठीच्या तुलनेत इंग्रजीत दोन ‘व’ आहेत.


1. ‘v’ उच्चारताना वरचे दात खालच्या ओठावर जरा आतल्या बाजूस ठेवायचे असतात आणि गळ्यावर कंपने जाणवतील अशा प्रकारे '' चा उच्चार करायचा असतो.


2. ‘w’ उच्चारताना ओठांचा चंबू करावा लागतो. मराठीतील '' आणि '' हे स्वर पटापट उच्चारून ओठांवर जोर दिला कि हा ‘w’ उच्चारता येतो.


उअ उअ उअ उअउअ उअ उअ = w


"असेच फरक ट, ड, क, फ, च, ज इत्यादींच्या उच्चारातही आहेत."

मराठी स्वर Vs इंग्रजी स्वर -

मराठी आणि इंग्रजीत असलेला एक महत्वाचा फरक म्हणजे इंग्रजीतील Diphthong (दोन स्वर एकत्र येऊन बनलेला स्वर). मराठीत अशा प्रकारचे दोनच स्वर आहेत जे बहुतांशी वापरले जातात - ‘ऐ’ आणि ‘औ’. पण इंग्रजीत आठ Diphthong आहेत जे मराठीत नाहीत.

उदा. /ei/ (एइ) – Make (मेइ्क)

/ua/ (ऊअ्) – Feul (फ्यूअ्ल)

/oy/ (ऑय) - Oil (ऑयल) इत्यादी

 

आता तुम्हाला एक प्रश्न पडणे साहजिक आहे.

"माझ्या आसपासच्या लोकांना मी बोललेलं कळतं; मग मला काय गरज माझ्या इंग्रजी भाषेत हा असा बदल घडवून आणण्याची?"

आज इंग्रजी भाषा चांगल्या प्रकारे बोलता येणे हे बहुराष्ट्रीय कंपन्यामध्ये काम करताना फार महत्वाचे आहे. ज्यांचे इंग्रजीवर प्रभुत्व त्यांना अशा ठिकाणी बढतीच्याही संधी अधिक असतात कारण ते परदेशी लोकांशी अधिक चांगला संवाद साधू शकतात आणि त्याहून महत्वाचे म्हणजे परदेशी लोकांनाही त्याचे इंग्रजी समजणे सोपे जाते.


अगदीच इंग्लंड वा अमेरिकेतल्या लोकांसारख इंग्रजी बोलता यावं असंही नाही. आज ग्लोबल इंग्रजीचा आग्रह धरला जातोय. इंग्रजीचा असा प्रकार जो कुठल्याही दोन देशाचे नागरिक बोलत असले कि त्यांना बोलता यावा आणि समजण्यासही तो सोपा असावा. ह्यालाच Neutral English (न्युट्रल इंग्लिश) असेही म्हणतात.


तुम्ही आमच्या Accent Neutralization Program मध्ये हे शिकू शकता. We would love to help you!


13 views0 comments