top of page

तुमचे नेहमी इतरांशी वाद होतात? मग एकदा तरी हे करून बघा!
हिचेन्स नावाच्या एका विचारवंताने अगदी अचूक शब्दात म्हटले आहे, "जर एखादी गोष्ट पुरावे नसतानाही मान्य करता येत असेल, तर ती पुरावे नसताना अमान्यही करता येते".


प्रत्येकाला प्रत्येकाच्या मतांमागची असलेली कारणे विचारण्याचा तसेच त्याबद्दल असलेली माहिती अथवा पुरावे जाणून घेण्याचा अधिकार असतो. जर योग्य कारणे, माहिती वा पुरावे नसतीलच तर मग कोण काय म्हणतो ह्याला फारसे महत्व उरत नाही आणि वादविवाद करण्याचा तर प्रश्नच येत नाही.


असे असले तरीही सर्वात चांगला ऍक्टर वा ऍक्ट्रेस कोण, सर्वोत्तम राजकीय नेता कोण, सर्वात चांगला धर्म कोणता, अमुक गोष्ट एखाद्या विशिष्ट पद्धतीनेच का करावी; ह्या आणि अशा बऱ्याच विषयांवरून लोक एकमेकांशी सतत वाद घालत असतात. प्रत्येक जण आपापले म्हणणे अगदी रेटून धरतो आणि बऱ्याचदा असे वाद विकोपाला जाऊन त्यांचे रूपांतर शिव्याशाप तर कधी मारामारी करण्यातही होते. अगदी जीवश्च-कंठश्च मित्र, जवळचे नातेवाईक; एवढेच नाही तर सख्खे भाऊ, बहिणी, आई-वडील, ऑफिसमधील सहकारीही अशा विषयांवरून वाद घालताना दिसतात.